दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल) च्या पदांसाठी मेगा भरती 2022

majhi naukri delhi police hc recruitment 2022

 

majhi naukri delhi police hc recruitment 2022

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल मिनिस्टीरियल ची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. 

                          लेखी परीक्षेसाठी परीक्षा सेंटर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती व नागपूर या ठिकाणी असल्याने महाराष्ट्रातील तरुणांना सोपे झाले आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र तरुणांनी आपले ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या दिल्ली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सादर करावेत. 

 

एकूण रिक्त पदे :- 835

पदाचे नाव व तपशील :- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

 

शैक्षणिक अर्हता :- 

                     उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा. किंवा समतुल्य अर्हता प्राप्त केलेला असावा. आणि इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिटे किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रती मिनिटे .

 

वयाची पात्रता :- 

                     उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2022 पर्यंत 18 वर्ष ते 25 वर्ष दरम्यान असावे. आणि SC, ST उमेदवारांना 05 वर्ष सूट तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 

 

वेतनश्रेणी :- 

                   सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 – 81,100 रुपये अधिक इतर देय भत्ते 

 

निवडीची प्रक्रिया :-  

                     सर्वप्रथम अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची 100 गुणांची संगणकावर लेखी परीक्षा घेण्यात येईल. 

लेखी परीक्षेची योजना पुढीलप्रमाणे :- 

1) जनरल नॉलेज – 20 गुण 

2) गणित – 20 गुण 

3) बुद्धिमत्ता – 25 गुण 

5) इंग्रजी – 25 गुण 

6) संगणकाचे ज्ञान – 10 गुण 

एकूण 100 प्रश्न असतील व 90 मिनिटांचा कालावधी असेल. आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील. 

लेखी परीक्षा पास झाल्यावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये, 

उंची – 165 cm पुरुषांसाठी 

         157 cm महिलांसाठी 

छाती (फक्त पुरुषांसाठी) – 78 cm व फुलविण्याची क्षमता 4 cm

 

पुरुषांसाठी :- 

1) 1600 मीटर धावणे 07 मिनिटात

2) 12.5 फूट लांब उडी

3) 3.5 फूट उंच उडी

महिलांसाठी :-

1) 800 मीटर धावणे 05 मिनिटात

2) 09 फूट लांब उडी

3) 03 फूट उंच उडी

शारीरिक चाचणी ही केवळ पात्रता स्वरूपाची असेल. ती पास झाल्यावर संगणकावर 25 गुणांची टंकलेखन चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जातील.

यानंतर शेवटी संगणकाची मूलभूत तत्त्वे (जसे की ms Excel, ms word, web browsers इत्यादि) याची एक चाचणी घेण्यात येईल. जी पात्रता स्वरूपाची असेल. 

 

परीक्षा शुल्क :-  

                    ओपन व ओबीसी विद्यार्थ्यांना 100 रुपये तर एससी, एसटी, माजी सैनिक व महिलांसाठी शुल्क नाही. 

 

नौकरी करण्याचे ठिकाण :-  संपूर्ण दिल्ली 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 16 जून 2022 रात्री 11 वाजेपर्यंत 

 

अधिकृत जाहिरात (PDF) : येथे पहा

भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ : येथे पहा.

ऑनलाईन अर्ज येथे करा : येथे पहा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.